काँग्रेस भोर तालुका कार्यकारणीवर उपाध्यक्षपदी पांडे गावातील मोनीश थिटे यांची निवड.
सारोळे : भोर तालुक्यातील पांडे गावातील युवा उद्योजक मोनीश थिटे यांची भोर तालुका काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीवर उपाध्यक्षपदी रविवार दि. ११ ऑगस्ट २४रोजी फार्मसी हॉल येथे निवड झाली आहे. भोर, राजगड, मुळशी कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे,मा.उपसभापती रोहन बाठे, काँग्रेस नेते शैलेश सोनवणे,पुणे जिल्हा युवक अध्यक्ष महेश टापरे, नितीन दामगुडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
भोर तालुक्यातील ग्रामीण भागात काँग्रेस पक्ष तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार तसेच सर्वाना सोबत घेऊन प्रतिसादात्मक कामातून नागरिकांना काँग्रेस पक्ष विषयी जागरूकता निर्माण करणार.
यावेळी भोर तालुका युवक अध्यक्ष नितीन दामगुडे, पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष तोसिफ अत्तार, काँग्रेस नेते अनिल सावळे, भोर तालुका खरेदी विक्री संचालक महेश धाडवे उपस्थित होते.
तसेच पांडे गावातील युवा सरपंच तेजस साळुंके,सामाजिक कार्यकर्ते महेश साळूंके, सतीश साळुंके,शंकर साळुंके,चेतन साळुंके, रवींद्र साळुंके, श्याम राऊत,शरद चव्हाण,किरण साळुंके आदी तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे


