कामथडी येथे मोटरसायकल स्वरास दोघांनी मारहाण करून लुटले.
नसरापूर : पुणे ते सातारा जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर कामथडी गावच्या हद्दीत मोटरसायकल स्वरास थांबूवून मारहाण करून लुटले. याप्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ते सातारा जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवार दि.5/4/24 रोजी 1:00 वा चे सुमारास मोहम्मद अनिस शेख वय 27 वर्ष रा. मलकापूर ता कराड जि सातारा हे जात असताना पाठीमागून ओव्हरटेक करून स्प्लेंडर मोटरसायकल वरून आलेल्या तीन इसम नावे 1) सुनील रघुनाथ मादरुवार वय 21 वर्ष रा. सुकल्याण मित्र मंडळ सुतारदरा कोथरूड पुणे 2) ऋषिकेश चंद्रकांत चंदनवाले वय 20 वर्ष रा. फुरखुती पुणे 3) लकी देविदास बर्गे वय 23 वर्ष रा. सातववाडी पुणे हडपसर यांनी शेख यांच्या गाडीच्या बॅगा पडायला लागल्या म्हणून गाडी थांबवली व नंतर फिर्यादी मोहम्मद शेख यांना लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करून मोबाईल आणि 1200 रु. रोख रक्कम चोरी करून घेऊन गेले आहेत. म्हणून त्यांच्याविरुद्ध राजगड पोलीस स्टेशन मध्ये शेख यांनी तक्रार दाखल केली आहे.
याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. सइ सुतनासे करीत आहेत.

