भाजप पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून डॉ. सौ. सुरभीताई भोसले यांनी वाई शहरातील कार सेवक व पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन भेट दिल्या.
वाई प्रतिनिधी: आशिष चव्हाण
आज सकाळी उपाध्यक्ष अमित वनारसे यांच्या निवास स्थानी भाजपा चा ध्वज फडकवून ध्वजाचे पूजन करून ध्वजाला वंदन करण्यात आले. आजच्या दिवसाचे औचित्य साधून आज सकाळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय विजयाताई भोसले, आदरणीय विजयाताई कुबेर, तसेच माजी शहराध्यक्ष आदरणीय अजितदादा वनारसे यांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कारसेवक डॉक्टर मधुसूदन मुजुमदार यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर भाजपाचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय सतीशजी शेंडे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच भाजपाचे जेष्ठ नेते यशवंत जी लेले यांचाही सत्कार करण्यात आला. अशा प्रकारे आज सकाळी वाई शहर भाजपाच्या वतीने सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने सातारा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा डॉ.सुरभिताई भोसले, जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास बापू पिसाळ व अजय मांढरे, प्रदेश हस्तकला व शिल्प विभाग अध्यक्ष सचिन घाटगे, कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष तेजस जमदाडे , शहर अध्यक्ष विजय ढेकाणे, नगरसेविका रूपालीताई वनारसे, उपाध्यक्ष अमित वनारसे, उपाध्यक्ष विकास जाधव, उपाध्यक्ष डॉ.मकरंद पोरे,महिला आघाडी अध्यक्षा अपर्णा ताई वाईकर, युवा मोर्चा अध्यक्ष सूरज धनवे, कामगार मोर्चा अध्यक्ष श्रीकांत कुंभार, चिटणीस सारीकाताई गवते, कोशाध्यक्ष सुनील साठे, अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष श्रीपाद कदम, प्रज्ञावंत आघाडी अध्यक्ष अरविंद बोपर्डीकर, जेष्ठ नागरिक सेल अध्यक्ष चंद्रशेखर वनारसे, सोशल मीडिया सहसंयोजक केदार राजपूत, बूथ अध्यक्षा भारती ताई कुलकर्णी, सौ. स्नेहल सुहास देशपांडे, जेष्ठ सदस्य प्रवीण केळकर, नरेंद्र महाजन, उत्तम जायगुडे, विक्रम पानसे, सुधीर भागवत, ऍड. प्रतीक वनारसे, सौ. कोमल वनारसे, चेतन जमदाडे, विस्तारक अलंकार सुतार उपस्थित होते
तसेच कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष तेजस दादा जमदाडे यांच्या निवासस्थानी शहर पदाधिकरी यांनी भेट दिली.