किसन वीर व खंडाळा कारखान्याला मदत मिळवुन देऊन आबा नावाला साजेसे काम मकरंद पाटील यांनी केले


उपसंपादक :दिलीप वाघमारे

ADVERTISEMENT

आई व बाबा या दोन्ही नावांना एकत्र केले की आबा हे नाव तयार होते. आज किसन वीर व खंडाळा कारखान्याला ४६७ कोटी रुपयांची मदत मिळवुन दिल्यामुळे ७५ हजार सभासद व कर्मचार्‍यांचे खऱ्या अर्थाने आईबाबा होण्याचे भाग्य किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार मा. श्री. मकरंद पाटील यांना लाभले आहे. कारखान्याला मिळालेल्या मदतीमुळे दोन्ही कारखाने सक्षमपणे सुरू होऊन शेतकरी व कामगारांच्या जीवनात आर्थिक विकास होणार आहे. या सर्व कामात जिल्हा बँकेचे चेअरमन मा. नितीन पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा. प्रमोद शिंदे, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक  जितेंद्र रणवरे यांनी सहकार्य केले. आज झालेल्या मा. संचालक मंडळाच्या बैठकीत कारखान्याच्या व कामगार युनियनच्यावतीने चेअरमन आमदार मा. श्री. मकरंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन मा. नितीनकाका पाटील, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे व संचालक मंडळ उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!