तायक्वांदो बेल्ट परीक्षेत डॉल्फिन इंग्लिश स्कूल सुसगावच्या विद्यार्थ्यांचे यशस्वी प्रदर्शन!
संपादक मंगेश पवार
कार्यकारी संपादक सागर खुडे
सुसगाव (ता.मुळशी जि. पुणे)
दिशा फाउंडेशन संचलित डॉल्फिन इंग्लिश स्कूल, सुसगाव येथील विद्यार्थ्यांनी गुरुकुल मार्शल आर्ट्स अॅण्ड स्पोर्ट्स अकॅडमी महाराष्ट्र आयोजित तायक्वांदो कलर बेल्ट परीक्षेत यशस्वी सहभाग नोंदवून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
या परीक्षेत शाळेचे विद्यार्थी रुद्र संभाजी गाडे याने यलो बेल्ट मिळवून आत्मविश्वासपूर्ण आणि शिस्तबद्ध कौशल्याचे दर्शन घडवले. तसेच सई किरण साळेकर हिने ब्लू बेल्ट मिळवत तिच्या मेहनतीची आणि चिकाटीची प्रचिती दिली.
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेच्या संचालिका सौ. संपदा विजय फोवकांडे आणि मुख्याध्यापिका सौ. शिला डांगे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना प्रशिक्षक किरण साळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल शाळा परिसरात आनंदाचे वातावरण असून कुटुंबीय, शिक्षकवृंद आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


