कै/ अमृत शेठ क्षीरसागर यांच्या मालकीच्या श्री संत सावता महाराज मंदिरातून दिंडीचे लोणंद वरून आळंदी कडे प्रस्थान
लोणंद सातारा : दिलीप वाघमारे
कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी अनेक वर्षाची परंपरा असलेले लोणंद गावची दिंडी श्री महादेव उर्फ बंडा शिरसागर यांच्या नेतृत्वाखाली लोणंद वरून आळंदी कडे प्रस्थान 28 जून रोजी सकाळी झाले आहे श्री सावता महाराज मंदिरामध्ये श्री नामदेव भाऊ शिरसागर यांच्या शुभ हस्ते ट्रकचे पूजन करून तसेच मांढरदेव देवस्थानचे विश्वस्त ह भ प सुधाकर महाराज शिरसागर यांच्या शुभहस्ते जय मल्हार टूरचे मालक दीपक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आरती करून दिंडी मार्गस्थ करण्यात आली दिंडी चालक स्वप्निल शिरसागर सुभाष शेळके रामचंद्र जाधव गणेश सोनवणे अरुण पाटील भास्कर झांजुर्णे वैशाली भोसले रांजणे नाणी भारतीय राऊत भारती राऊत लोणंद मांढरदेव पाचगणी नांदेड माहूरगड या ठिकाणावरून आलेले सर्व वारकरी उपस्थित होते तसेच सावता माळी मंदिरापासून माऊलीच्या पालखीतळापर्यंत फेरा मारून आरती करून दिंडी आळंदी कडे मार्गस्थ करण्यात आलेले आहे या दिंडीची खास बाब सर्व आभाल वृद्ध वारकरी यांना सर्व सुखाई सोयी पुरवण्यात येत असतात त्यामुळे या पालखीची सातारा जिल्ह्यात प्रसिद्धी आहे खंडाळा तालुक्यातील ही दिंडी संपूर्ण तालुक्याचा आदर्श बनत चालली आहे


