राजगड कॅम्पसमध्ये सूर्यनमस्कार,विविध योगासने व योग दिन साजरा.
संपादक : मंगेश पवार
सारोळे : राजगड ज्ञानपीठाचे अनंत निर्मल ग्लोबल स्कूल धांगवडी येथे दिनांक २१ जून रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला.
२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योगविषयीचे महत्त्व विशद करण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2015 पासून जगभरात हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले.
योगसाधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे आणि ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्व पटवून देणे ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच २१ जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान असतो. त्यामुळे जगभरातील अनेक भागामध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. परंतु याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन सुरू होते आणि याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योगविषयीचे ज्ञान जगासमोर आणले. म्हणून २१ जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य दिन साजरा करण्यात येतो. यावेळी सर्व मुलांचे शारीरिक व्यायाम व उत्तेजक हालचाली आणि योगासने सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी केली.
अनंत निर्मल ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. अनंत निर्मल ग्लोबल स्कूलच्या मुख्याध्यापिका, सौं. सबिहा शेख तसेच इस्टेट मॅनेजर राहुल खामकर, व शिक्षक उपस्थित होते. हा प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राजगड कॅम्पस येथे झाला. अनंत निर्मल ग्लोबल स्कूल धांगवडीच्या मुख्याध्यापिका,सौं. सबिहा शेख यांनी शारीरिक, मानसिक स्वास्थ जपण्याची योग परंपरा हजारो वर्षांपासून भारतात आहे. ही परंपरा घराघरात, जगभर पोहोचविण्याचे काम सर्वांनी करावे. सुदृढ, बलशाली भारताचे स्वप्न त्यातून साकार होईल’, असे प्रतिपादन यांनी यावेळी केले.


