गमेवाडी विद्युत मोटर चोरी प्रकरणी मल्हारपेठ पोलिसांची धडक कारवाई माझगाव येथील तीन युवक ताब्यात.


सातारा प्रतिनिधी : शंकर माने

ADVERTISEMENT

चाफळ गमेवाडी ता. पाटण गावच्या हद्दीतील गट क्रमांक 29 /5 मधील चिरखानी नावाच्या शिवारात उत्तर मांड नदीच्या पात्रात जाळगेवाडी गमेवाडी रस्त्यालगत शेतीला पाणी पाजण्यासाठी ठेवलेली सुमारे 18 हजार रुपये किमतीची लक्ष्मी कंपनीची पाच एचपी ची पाण्यातील इलेक्ट्रिकल मोटर व तिचे पेटीजवळील केबल कापून अज्ञात इसमाने चोरून नेल्याची फिर्याद शकील मुल्ला राहणार गमेवाडी .यांनी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात दिली. होती सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले .यांनी घटनास्थळी भेट घेऊन ,चाफळ पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक रामराव वेताळ व पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ शेडगे यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या गुन्ह्याच्या तपासामध्ये गोपनीय माहिती बाबत .काही लोकांची माहिती प्राप्त झाली त्या लोकांच्या हालचाली पडताळल्या त्यामध्ये तीन इसमांचे अधिक चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही म्हणून त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची सखोल चौकशी केली असता लक्ष्मी कंपनीची पाच एचपी पाण्यातील मोटर असा 18000 रुपये किमतीची चोरी केल्याबाबतची कबुली दिली, आरोपींच्या ताब्यातील मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नं. 96 /2024 कलम-379.34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझगाव येथील अजय बाबुराव जाधव वय 33 ,.पंकज सुनील पाटील वय 27, संभाजी उर्फ गणेश शिवाजी भोसले वय 34, या तिघांना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख ,अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल ,पोलीस उपअधीक्षक सविता गरजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक चेतन मछले पोलीस उपनिरीक्षक नितीन पोटे रामराव वेताळ सिद्धनाथ शेडगे यांनी केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!