भोर राजगड मुळशी विधानसभेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज! निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात.


 

भोर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच भोर, राजगड, मुळशी तालुक्यातील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

या विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 421,554 मतदार आहेत यामध्ये पुरुष मतदार संख्या 223356 हजार तर महिला मतदार 198191 आणि इतर 6 असल्याची माहिती भोर विधानसभा मतदारसंघाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली.

 

अर्ज दाखल करण्यासाठी 22 ते 29 ऑक्टोबर सकाळी 11 ते 3 या वेळेत भरायचा आहे. अर्जाची छाननी 30 ऑक्टोबरला होईल तसेच चिन्ह वाटप त्याच दिवशी असणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबर ही तारीख असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राजकीय पक्षांना 1 सूचक लागतो. उमेदवाराला 10 हजार डिपॉझिट असून पाचशे रुपये स्टॅम्प वरती खर्चाचा तपशील द्यावा लागेल.

भोर राजगड मुळशी मतदारसंघांमध्ये 564 मतदान केंद्रे असून भोर मध्ये 240,राजगड 96 मतदान केंद्रे, तर मुळशी मध्ये 228 मतदान केंद्र आहेत. यासाठी 3500 हजार कर्मचारी लागणार असून 70 झोनल ऑफिसर ची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

नॉमिनेशन तहसीलदार ऑफिस भोर येथे करायचा आहे. कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग नवसह्याद्री कॉलेज केळवडे येथे होणार आहे. ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम आयटीआय भोर, ईव्हीएम ट्रेनिंग,मतमोजणी ही आयटीआय भोर येथे होणार आहे.

राज्यात आदर्श आचारसहिता चालू झाली आहे. मतदारांना मतदान केंद्र येथे सावलीची सोय केली असून, मतदान केंद्रामध्ये स्वतंत्र रॅम्प, अपंग मतदारांसाठी व्हील चेअर ची सोय केली जाणार आहे.एसटी बस ड्रायव्हर,पोलीस,कर्मचारी यांच्यासाठी पोस्टल मतदान सुविधा दिली जाणार आहे.

भोर तालुक्यातील सोसायटी आणि हिंजवडी येथील सोसायटी साठी सहा मतदान केंद्र मतदान वाढीसाठी करण्यात आले आहेत. उमेदवाराला महाराष्ट्रामध्ये चार अर्ज भरता येतात. त्याचा खर्चाचा तपशील 40 लाख रुपये आहे. उमेदवारांनी सुविधा फॉर्म ॲप मध्ये भरून दिलेल्या वेळेमध्ये प्रांत ऑफिसमध्ये दि.29 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत जमा करायचा आहे.हा ऑनलाइन सुविधा अँप दि.28 ला चालू असून 29 ला चालू रहाणार नाही. मतदारसंघांमध्ये कोठेही आचारसंहितेचा भंग झाला असल्यास नागरिक “बिडीओ” यांच्याकडे तक्रार करू शकतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!