आंबाडे गावच्या ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.माधुरी शिवाजी खोपडे यांची निवड.
दि. १७ भोर: तालुक्यातील आंबाडे गावच्या ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.माधुरी शिवाजी खोपडे यांची निवड झाल्याबद्दल कार्यसम्राट आमदार मा.श्री.संग्राम थोपटे यांनी सत्कार व अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी भोर तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय सोळसकर, भोर तालुका महिला काँग्रेस उपाध्यक्षा अर्चना दादासो खोपडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुका उपाध्यक्ष ताराचंद रामराजे खोपडे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर कृष्ण खोपडे (सर), गीताताई प्रसन्न उल्हाळकर, विकास सेवा सोसायटीचे संचालक विकास राजाराम खोपडे, संभाजी बाजीराव खोपडे, किशोर श्रीरंग खोपडे, तुकाराम जिजाबा उल्हाळकर, मोहन रामभाऊ खोपडे, गणेश मधुकर खोपडे, बाळासो निकम, सुचिता सचिन खोपडे, स्वप्नाली अशोक खोपडे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.