पदोन्नती नाकारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर करणार कारवाई :- पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांचा आदेश.


 

प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी

ADVERTISEMENT

एकीकडे पदोन्नती मिळत नाही म्हणून अनेक पोलीस अधिकाऱ्यांना माहिनोणती प्रतीक्षा करावी लागते, तर दुसरीकडे पदोन्नती मिळूनही ती नाकारण्याचे कारण न देता पदोन्नती नाकारणाऱ्या चार पोलीस निरीक्षकांना साईड ब्रँचमध्ये (अकार्यकारी पदावर) बसविण्याचा निर्णय राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतला आहे, मात्र काही पोलिस अधिकाऱ्यांकडून पदोन्नती नाकारण्याचे चित्र चांगले दिसून येत आहे, अशा पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा पोलीस महासंचालकांनी चांगलाच उगारला आहे, यामध्ये पुणे युनिट मधील नितीन जाधव,सुदाम पाचोकर आणि जळगांव युनिटमधील सुहास देशमुख व मुंबई युनिटमधील मनीष झेंडे यांच्यावर पदोन्नती नाकारल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे, अलीकडेच पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देवुन पोलीस उपअधीक्षक बनवले गेले आहे, मात्र त्यातील काही पोलीस निरीक्षकांना वर कमाईचे पोस्टिंग सोडण्याची इच्छा नसल्याने ते पदोन्नतीवर जाण्यांस तयार नसल्याचे कुणकुण पोलीस महासंचालकांना लागली होती, त्यामुळे त्यांना पदोन्नती नाकारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना साईट पोस्टिंग देण्याचा इशारा दिला होता, पदोन्नती नाकारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची संख्या जवळपास ३५ते ४० च्या घरात दिसून येत आहे,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!