बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७,३४, ३०० रुपयांचा सोने चांदीचा ऐवज लंपास.
नसरापूर : नसरापूर ता. भोर जि. पुणे येथील धायरेश्वर सोसायटी मधील फ्लॅटमध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १० तोळे ७३४३०० किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरून नेले आहे.
याप्रकरणी खंडू सिताराम मोहिते ( वय ५३ वर्ष मुळ गाव वाठार ता. फलटण जि. सातारा ) यांनी राजगड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नसरापूर येथील धायरेश्वर सोसायटी मधील फ्लॅट नं. १०३ चे दरवाजाचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने ७३४३०० किमतीचा ऐवज घरफोडी करून अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.
तेजस खंडू मोहिते हे नागपूर येथे एअरपोर्टला कामाला असून रविवारी सुट्टी घेऊन गावाला आल्यानंतर त्यांनी भोरला आजीला भेटण्यासाठी भाऊ आणि आईला घेऊन गेले होते.
त्यावेळी त्यांचे वडील हे खंडू मोहिते कामावर गेले असताना, अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून चोरी केली आहे.
सासवड येथील दूरक्षेत्राचे पोलीस एस.डी. पी.ओ, पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो. स. ई. पवार करीत आहेत.