भोंगवली-किकवी-केंजळ-सारोळे परिसरात विकासाचे नवे पर्व उमेदवार चंद्रकांत बाठे यांच्या पुढाकारातून साकारलेली शाश्वत कामगिरी!
मंगेश पवार
सामाजिक कार्यकर्ते नारायण भिलारे यांचे मत — “बाठे यांनी शब्द दिला आणि काम पूर्ण केले!”
दि. 4 सारोळे (भोर):- आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोंगवली कामधडी मतदारसंघात उमेदवार चंद्रकांत बाठे यांच्या कार्याचा ठसा ठळकपणे उमटला आहे. सामाजिक कार्यकर्ते नारायण भिलारे (किकवी) यांनी सांगितले की, “बाठे यांनी केवळ आश्वासन दिलं नाही, तर गावागावात प्रत्यक्ष कामं करून दाखवली. लोकसहभाग आणि शासकीय निधी यांचा योग्य समन्वय साधून त्यांनी विकासाचे आदर्श उदाहरण घालून दिले.”

त्यांच्या पुढाकारातून साकारलेली महत्त्वाची कामगिरी :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केंजळ — शताब्दी वर्षानिमित्त शाळेचा मास्टर प्लॅन तयार करून लोकसहभाग आणि शासकीय निधीमधून सुमारे ३ कोटी रुपयांचा खर्च करून सुसज्ज शाळा इमारत व परिसर उभारला.
हिंदवी स्वराज्य उद्यान, केंजळ — ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व उठण्याची सुविधा, व्यायामासाठी जागा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून गावात ऐतिहासिक अभिमान निर्माण केला.
ओपन जिम व जॉगिंग ट्रॅक, केंजळ — पंचक्रोशीतील नागरिकांसाठी आरोग्यवर्धक सुविधा निर्माण केल्या.
किकवी–केंजळ काँक्रीट रस्ता — दीड किलोमीटर लांबीचा व सात मीटर रुंदीचा रस्ता पीएमआरडी योजनेंतर्गत सुमारे ९ कोटींच्या निधीतून मंजूर करून घेतला.
मौजे पांडे क्रिकेट ग्राउंड — युवकांसाठी प्रेरणादायी उपक्रम म्हणून सुमारे २१ लाख रुपये स्वखर्चातून आधुनिक क्रिकेट ग्राउंड उभारले.
खोलजाई मंदिर रस्ता, किकवी — सुमारे १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून रस्ता तयार करण्यात आला.
किकवी गाव पाणीपुरवठा योजना — ३ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला, यामुळे गावाला कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटला.
नवीन पाणी टाकीकडे जाणारा रस्ता, किकवी — सुमारे १० लाख रुपये खर्चून काँक्रीट रस्ता तयार केला.
भोंगवली प्राथमिक शाळा — दोन नवीन शाळा खोल्या मंजूर करून घेतल्या.
सारोळे गावातील शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण गावाच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी विशेष निधी टाकला.
सारोळे गावातील चिलावळी आई मंदिरासाठी स्वखर्चाने मदत — श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या या मंदिरासाठी स्वखर्चातून निधी देऊन दुरुस्ती व परिसर सुधारणा केली.
मौजे पांडे (पूर्व भाग) — युवकांसाठी मोठे व सुसज्ज ग्राउंड स्वखर्चाने बांधले, जेथून तरुणाईसाठी क्रीडा व सामाजिक उपक्रमांना चालना मिळाली.
“चंद्रकांत बाठे हे विकास आणि समाजसेवेचं प्रतीक आहेत. त्यांनी केवळ पायाभूत सुविधा नाही, तर शिक्षण, आरोग्य आणि संस्कृती या तिन्ही क्षेत्रांत सकारात्मक बदल घडवले. म्हणूनच आज संपूर्ण भोंगवली कामथडी मतदारसंघ बाठे यांच्या कामाची प्रशंसा करत आहे.”
नारायण भिलारे,सामाजिक कार्यकर्ते किकवी
भोंगवली कामधडी मतदारसंघात चंद्रकांत बाठे यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना प्रचंड जनसमर्थन मिळण्याची शक्यता आहे,भोंगवली कामधडी मतदारसंघात बाठे यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना प्रचंड जनसमर्थन मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.त्यांच्या कामांमुळे सर्व गावांत “काम बोलतंय, बाठे चालतायत!” असा माहोल निर्माण झाला आहे.
साईनाथ धाडवे युवा नेतृत्व भोंगवली पंचायत समिती गण

			
