आमदार शिंदे महाविद्यालय, प्रॅक्टिकल कोर्स बजाज फिनसर्व्ह सोबत सामंजस्य करार;
जावळी प्रतिनिधी : बजरंग चौधरी
मेढा :-जयवंत प्रतिष्ठान, हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयांचे वाणिज्य विभागाचे वतीने ,बजाज फिनसर्व्ह यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन बँकिंग, फायनान्स अॅण्ड इन्शुरन्स’ हा प्रॅक्टिकल कोर्स नुकताच झाला.
प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांच्या प्रयत्नामुळे बजाज फिनसर्व्ह कंपनीच्या सीएसआर निधीतून हा कोर्स घेण्यात आला. या कोर्ससाठी वाणिज्य विभागातील ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. बजाज फिनसर्व्हतर्फे तज्ज्ञ व अनुभवी प्रशिक्षकांनी मेढा येथे आमदार कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर प्रशिकक्षनात विमा, बँकिंग आणि फायनान्ससोबतच व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखत तंत्रे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शंभर दिवसाच्या कोर्सनंतर विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा व मॉक इंटरव्ह्यू घेण्यात आले. यात यशस्वी झालेल्या ३४ विद्यार्थ्यांना प्राचार्य गिरी तसेच उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. कोर्सचे समन्वयक म्हणून प्रा. अमेय देसाई व प्रा. संग्रामसिंग नलवडे यांनी काम पाहिले. कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना बजाज फिनसव्हद्वारे प्लेसमेंट सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार असलेची माहिती समन्वयक अमित यालगी यांनी दिली


