खंबाटकी घाटात प्रवाशांच्या सेवेसाठी उपाययोजना करण्याबाबत प्रशासनास निवेदन जारी.
उपसंपादक : सागर खुडे
बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या आणि मृत्यूचा सापळा झालेल्या खंबाटकी घाट खंडाळा नजीक असून खंबाटकी या घाटामध्ये वारंवार रस्ता दुरुस्तीची कामे रस्ते विकास प्राधिकरण तर्फे चालू असतात.आणि रस्त्याची कामे चालू असलेमुळे सदर घाटामध्ये काही अंतर सोडून अरुंद रस्ते देखील आहेत.त्यामुळं वाहतूक गोंडीची समस्या वेळोवेळी उद्भवत आहे. तसेच घाट माथ्यावरील तीव्र उतारामुळे अपघाताचे प्रमाणदेखील खूप वाढलेले आहे.या सर्व गोष्टींचा प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. सदर घाटामध्ये अपघातांचे वाढते प्रमाण पाहता अशा परिस्थितीमध्ये वाहने खंडाळा अथवा नजिकचे गाव भागात आणण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागते.आणि अशातच जीवित हानी होऊ नये यासाठीच्या उपाय योजनांचा प्रश्न पडतो.त्यासाठी प्रवाशांच्या सेवेसाठी योग्य वेळी अपघात ग्रस्त व्यक्तीला उपचार न मिळाल्यामुळे वाहनांच्या रांगा लागतात आणि वेळेअभावी प्रवासी दगावलेच्या घटना घडलेल्या आहेत.अशा वेळी रस्तेविकास प्राधिकरणकडून यासाठीचे कोणतेही सहकार्य मिळत नाही. व वैयक्तिक पोलिस अधिकाऱ्यानी क्रेन, किंवा रुग्णवाहिका मागणी केल्यास योग्य वेळेत पाठवपुरावा होत नाहीं यासाठी तात्काळ रुग्णवाहिका व अपघात ग्रस्त गाडी उचलण्यासाठी क्रेनची(टोविंग)सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी मागणीपर आणि इशाऱ्याचे निवेदन दि.१६जुलै२०२४, मंगळवार रोजी खंडाळा तालुक्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि वाई विधानसभा संघटक नंदकुमार घाडगे यांनी सातारा जिल्हाधिकारी तसेच खंडाळा तालुका तहसीलदार यांना सुपूर्द केले असून यदाकदाचित याचा पाठपुरावा न केल्यास येणाऱ्या काळात सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि खंडाळा तहसील कार्यालयासमोर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय गप्प बसणार नाही असा निवेदनातून इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खंडाळा नेते रामदास कांबळे
यांच्यासह कार्यकर्ते मयूर कारळे, ओंकार वाघमोडे, कोबीक तारू, आकाश इंगवले, शुभम पंडित, सोमनाथ भोसले, मंगेश काकडे, आदिनाथ खुंटे, सुफियान सय्यद, फैज पटेल, बाळासाहेब संकपाळ, गोविंद गाढवे, प्रमोद शिंदे, हरिश्चंद्र धायगुडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


