कोरेगांव तालुक्यांच्या विद्यमान डी.वाय.एसपी सौ.सोनाली कदम यांना करंजखोप मध्ये गणपतीच्या आरतीचा मान,
संभाजी पुरीगोसावी
कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप या गावी रविवारी संध्याकाळी कोरेगांव तालुक्यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी सौ. सोनाली कदम यांना गणपतीच्या आरतीचा मान करंजखोप ग्रामस्थ तसेच कै.उदयसिंह धुमाळ युवा प्रतिष्ठान पारा खालचा सम्राट गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला, यावेळी गावातील बहुसंख्येने ग्रामस्थ माता बहिणी तसेच गावातील सर्वच मंडळाच्या कार्यकर्त्यांची देखील यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती, ग्रामस्थासह मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून डी. वाय एसपी सौ. सोनाली कदम मॅडम यांचे भव्य असे स्वागत करीत त्यांना गणेशोत्सवांच्या शुभेच्छा दिल्या, त्यानंतर डी.वाय.एसपी सोनाली कदम मॅडम यांनी गावातील महिला तसेच तरुण वर्गाला थोडक्यात मार्गदर्शन केले, यावेळी डी.वाय.एसपी सोनाली कदम मॅडम पुढे म्हणाल्या…. आपल्या तालुक्यांत रुजू झाल्यापासून करंजखोप हे गांव वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येते हे माहीत होते, परंतु आज आपल्या गणेशोत्सवांच्या अनुषंगाने करंजखोप या गावी येण्याचा प्रथमच योग आला, या करंजखोप,सोनके गावासह अनेक ग्रामीण भागात महसूल तसेच पोलीस खात्यात अधिकाऱ्यांची संख्या बहुसंख्येने आहे, तसेच आपणही आपले करिअर घडवून अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्णता करता आले पाहिजे…? असा त्यांनी थोडक्यात आपल्या मार्गदर्शनातून संदेश दिला, यावेळी संभाजी पुरीगोसावी यांनी देखील गणेशोत्सवांच्या शुभेच्छा देत आणि जयहिंद मॅडम … असे म्हणत आपल्या मातोश्री समवेत डी.वाय.एसपी मॅडम यांची आपल्या गावात सदिंच्छा भेट घेतली,