प्रशासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा,पण हताश शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर: कुलदीप कोंडे
कार्यकारी संपादक : सागर खुडे
सारोळे : सावरदरे ता. भोर जि. पुणे येथे गेली आठ दिवसापासून कोसळणाऱ्या सततधार पावसामुळे मातीच्या घराच्या भिंतीत पाणी मुरल्याने कच्ची घरे ढासळायला लागली आहेत. दि. २२ रोजी परशु बबन साळुंखे व अनिल बबन साळुंखे या दोन शेतकऱ्यांची घराची या पावसात पडझड झाली आहे. यावेळी मा. युवा सरपंच विकास चव्हाण यांनी कुलदीप कोंडे यांना घटना सांगितली.सतत पडणाऱ्या पावसाचे पाणी भिंतीमध्ये मुरून घरांच्या भिंती आणि छत पडले आहे. सुदैवाने त्या घरामध्ये कोणालाही काही झाले नसल्याने मोठा अनर्थ टळला. पण यामध्ये या दोन शेतकऱ्यांचे घरांच्या भिंती व छत पडल्याने त्यांना मोठया आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.आणि त्यातच पडझड झालेल्या तालुक्यांतील बऱ्याच गावात पंचनामें करूनही प्रशासनाकडून अजूनही कुठली मदत मिळाली नाही.पण कुलदीप कोंडे यांनी माणुसकीचा धर्म पाळण्यासाठी मदतीसाठी पुढें येत आथिर्क स्वरूपात जी मदत केली त्याबद्दल त्यांचे शेतकऱ्यांनी मनापासून आभार मानले. कुलदीप कोंडे यांनी रोख रक्कम कुटुंबाला दिली. ती रक्कम पेंजळवाडी गावचे मा.युवा सरपंच विकास चव्हाण यांचे माध्यमातूनच स्वतः कुलदीप कोंडे यांच्या वतीने शेतकऱ्यांना दिली.

प्रसंगी सावरदरे गावचे युवा सरपंच गणेश साळुंखे, अंकुश साळुंखे,गजानन साळुंखे,शंकर साळुंखे,शेखरं चव्हाण, हेमंत चव्हाण, पप्पू चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावर्षी उशिराने सुरू झालेला पावसाळा समाधानकारक असून, गेले आठ दिवस भोर शहरासह ग्रामीण भागात झालेल्या पावसाचे प्रमाण गगनभेदी असलेले पाहायला मिळाले.पण या पावसात पिकांसह शेत शिवाराचेदेखील मोठे नुकसान झाले असून, गावात घरांची पडझड झाली आहे. नुकसानीचे पंचनामे करून मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांना थेट आणि तात्काळ मदत मिळणेसाठी शासनदरबारी प्रयत्न करणार आहोत तसेच कुलदीप कोंडे युवा मंचच्या वतीने सुद्धा जास्तीत जास्त भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
जि.प.सदस्य कुलदीप कोंडे


