लोणंदच्या जि.प. मराठी शाळेत साचलीत पाण्याची डबकी
उपसंपादक: दिलीप वाघमारे
लोणंद येथे असणाऱ्या जिल्हा परिषदच्या मराठी शाळेत पाण्याची डबकी साचली असून मुलांना पाण्याच्या डबक्यांचा सामना करत शाळेत जावे लागत आहे लोणंद शहरात डेंगू आजराचे प्रमाण वाढले असून मुलांच्या आरोग्याला धोका आहे तरी संबंधित विभागांनी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे
जिल्हा परिषद मराठी शाळेच्या जाणाऱ्या गेटवरच मोठे डबके झाले असून या डबक्याच्या परिसरात आंगणवाडीच्या शाळा असून त्या डबक्याच्या इथेच लहान मुलांचा आहार बनवला जातो या शाळेतून लहान लहान मूले आहेत लोणंद शाळेच्या आवारातच गवत वाढलेले आहे डासांमुळे मलेरिया, डेंगी, चिकन गुनियांसारख्या आजाराला निमंत्रण मिळते त्यातच भर म्हणून लोणंद शहरात डेंग्यूचे प्रमाण वाढले आहे त्याचबरोबर प्रत्येक नागरिकांनी घराच्या आसपासच्या परिसरातही खड्डे किंवा इतर ठिकाणी पावसाचे पाणीसाचलेले नसेल याची दक्षता घ्यावी. घराच्या टेरेसवर जुन्या वस्तू, टायर याठिकाणी हमखास अशाप्रकारचे डास तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळं त्याची काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी नगरपंचायत मार्फत होणार्या जनजागृतीला सहकार्य करावे तसेच डेंग्यू चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.असे आवाहन नागरपंचायतीकडून करण्यात येत आहे त्यातच लहान मुलांच्याच शाळेत अशी पाण्याची डबकी झाल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्तिथ होत आहे तरी संबंधित विभागांनी त्वरित उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी नागरिकांकडून होत आहे


