आंबंवडे येथील तरुणावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
भोर प्रतिनिधी : सागर खुडे
भोर तालुक्यातील आंबवडे गावातील एका तरुणावर विणयभंग केल्याप्रकरणी भोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी घटनेची हकीकत अशी की, में २०२३ मध्ये फिर्यादीची मुलगी अंदाजे वय १५ ते १९वर्ष,
हीला गणेश शिवाजी भडाळे अंदाजे वय बर्ष २५मौजे रा.आंबवडे येथील हा तरूण नेहमी त्रास द्यायचा. मुलगी शाळेत जात असताना शाळेच्या मुख्य दरवाजा जवळ आरोपीने फिर्यादीच्या मुलीचा हात पकडून तीला लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारे मला तुझ्याशी बोलायचे आहे, तु माझ्यासाेबत का बोलत नाहीस,आणि जर ही गोष्ट घरात कोणास सांगितल्यावर तुझ्या भावाला मी संपवून टाकेन अशा तोऱ्यात धमकी दिली.त्यावेळी शाळेतील शिक्षकांनी आरोपीला पकडून मुख्याध्यापकांच्या समोर हजर केले असता, आरोपी शिक्षकांच्या अंगावर धावून गेला व त्यानंतर त्याने पलायन केले.
आराेपी मुलीला वारंवार त्रास देत होता.परंतू वाद नको ह्या अनुषंगाने मुलीने बऱ्याचदा त्याची समजूत काढली हाेती. तरीही आरोपीने अल्पवयीन पीडितेचा विनयभंग केला. पिडीत मुलीने ही बाब तिच्या घरात सांगितल्यानंतर दि.२४रोजी भोर पोलीस ठाण्यामध्ये स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली हाेती.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पाेलिसांनी भादंवि कलम ३५४, ३५४ अ,ड, ५०६,८,१२पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला हाेता. याप्रकरणी
भादंवि ३५४, ३५४ अ व पोक्साे कलम ७ व ८ अंतर्गत दोषी ठरववण्यात येऊन ३ वर्ष सक्त मजुरी, आणि दंड तसेच ३५४ ड अंतर्गत२ वर्ष सक्त मजुरी व ३ हजार रुपये दंड अशी एकूण ५ वर्षांची शिक्षा सुनावावी अशी तिच्या कुटुंबियांना मेहेरबान न्यायालयाकडून अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले.
सदर गुन्ह्याचा तपास भोर पोलीस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक आण्णासाहेब पवार यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक अनिल चव्हाण जलदगतीने तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
ह्यावर मुलगी जन्माला आली पण मुलींना आपल स्वतंत्र जीवन जगण्यावर एक मोठं प्रश्रचिन्ह असल्याचं समोर आलं. अशा नराधमाना नक्कीच न्यायालयीन कोठडीची शिक्षा व्हावी अशी समस्त ग्रामस्थांकडून देखील मागणी कऱण्यात येत आहे.