महिलेसह कुटुंबास लोखंडी रॉडने जबर मारहाण ; ४ जणांवर गुन्हा दाखल, वेळे येथील घटना .


 

वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण

ADVERTISEMENT

 

महिलेसह कुटुंबास लोखंडी रॉडने जबर मारहाण ; ४ जणांवर भुईंज पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि.28 रोजी दुपारी 4.00वा. चे सुमारास मौजे वेळे ता. वाई गावचे हद्दीत आराम हॉटेलचे पाठिमागे पुष्पा यादव फिर्यादी यांचे राहते घरासमोर यातील स्वाती दिपक पवार, पकंज मारुती पवार, कविता पंकज पवार, अक्षय दिपक पवार यांनी आप-आपसात संगनमत करुन फिर्यादीस तु माझे पतीस का फोन करते असे म्हणुन काठीने, रॉडने, हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करुन दुखापत केली आहे. तसेच यांच्या कुटुंबास हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे म्हणून त्या चौघांच्या विरुध्द भुईंज पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे याचा अधिक तपास भुईंज पोलिस करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!