सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ महायुतीची नसरापूर येथे जाहीर सभा.
मंगेश पवार
नसरापूर : राज्यात महत्वाची समजली जाणारी बारामती लोकसभा निवडणूक यामध्ये सुनेत्रा पवार या उमेदवाराच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नसरापूर (भोर) येथे जाहीर सभा बुधवार दि.१/५/२४ रोजी झाली.
या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलले की, भोर राजगड ( वेल्ह्याचा ) चेहरा मोहरा बदलनार असल्याचं आश्वासन अजित दादांनी दिलं आहे.
बारामती लोकसभेचे उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडून द्या. पुढच्या ५ वर्षांमध्ये आत्ताच भोर( वेल्हा )राजगड आहे त्याच्यापेक्षा ५ पट विकास नाही केला तर मला सांगा. मागच्या निवडणुकीत विरोधकांनी सांगितलं होतं की भोरमध्ये एमआयडीसी आणणार,नाही आणली तर मत मागायला येणार नाही असं सांगितलं तरी विरोधक मत मागायला येतात.
असं म्हणत अजितदादांनी विरोधकांवरती टीका केली.
पुढे बोलले की, उत्रौलीची एमआयडीसी आचारसंहिता संपल्यावर उदय सामंतांना सांगून माहिती सरकार काढून देईल. पर्यटनला चालना द्यायची गरज आहे. भोर तालुक्यातील रोहिडेश्वर, रायरेश्वर, बनेश्वर, नागेश्वर मंदिराचा विकास करून पर्यटनाला चालना देणार.
नसरापूर वेल्हा मढे घाट सेंट्रल रोड फंड किंवा वेगवेगळ्या फायनान्सच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून करून देणार.
त्यासाठी कोर्टाचा विरोध नसेल किंवा फॉरेस्ट खात्याचा अडचण नसेल तर मदत करणार.
पुढे बोलले की, ” लग्नाची पंगत बसल्यानंतर वाढप्या ओळखीचा असला पाहिजे तर जेवण जास्त मिळते आता वाढप्या समोरच बोलतोय
” भोर वेल्ह्याचे ” ताट येऊ द्या नाही त्यात जास्त टाकलं तर मला बोला.
यावेळेस हे सगळं प्रश्न मार्गी लागण्याकरता महायुतीला व घड्याळाच्या चिन्हासमोरील व्यक्तीला निवडून द्या.
या सभेसाठी भोर वेल्हा प्रचार प्रमुख कुलदीप कोंडे, रमेश कोंडे, निलिमा गोरे, अमोल पांगारे, रणजीत शिवतरे, हे उपस्थित होते.