कोथरूड आगारात आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
पुणे प्रतिनिधी | एस.एन.नांदेडकर
कोथरूड आगार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोठ्या जल्लोषात आणि उत्साही वातावरणात ही जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मोहन दडस (झोनल मॅनेजर), नागेश भीमराव गायकवाड (जनसंपर्क अधिकारी), सचिन वाबळे (आगार प्रमुख), दीपक भाऊ लोंढे (बस स्टँड मॅनेजर) तसेच विलास कांबळे (रिपब्लिकन पार्टी, पुणे शहर उपाध्यक्ष) उपस्थित होते. तसेच शत्रुघन प्रताप व पीएमएल युनिटचे पदाधिकारीही उपस्थित होते.
कार्यक्रमाला कोथरूड आगारातील रिपब्लिकन एम्प्लॉई फेडरेशनचे अधिकारी व पदाधिकारी, क्लार्क, कंडक्टर, ड्रायव्हर, स्टार्टर, स्वच्छता विभागातील कामगार, वर्कशॉप विभागातील कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने बंधू-भगिनी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन गणेशभाऊ कदम (अध्यक्ष, पुणे शहर रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन) यांच्या नेतृत्वाखाली दीपक भाऊ तेली, आनंद मस्के, विष्णुभक्त बापू बनसोडे, रोशन कडवे, तुकाराम कांबळे, ज्ञानोबा बोडके आदी पदाधिकारी व भीमसैनिकांनी केले.
सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.


