भोर बाजार समितीत नेतृत्व बदल; सभापतीपदी रजिवडे, उपसभापतीपदी शिंदे.
मंगेश पवार
भोर : भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या सभापती व उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर २०२३ ते २०२८ या कालावधीतील विद्यमान संचालक मंडळाची रचना चर्चेत आली आहे. या मंडळात विविध घटकांचे प्रतिनिधित्व असून शेतकरी, ग्रामपंचायत, व्यापारी तसेच हमाल व तोलारी मतदारसंघातील सदस्यांचा समावेश आहे.
सध्याच्या संचालक मंडळात सभापतीपदी आनंदा बाबुराव आंबवले तर उपसभापतीपदी ईश्वर बबन पांगारे कार्यरत आहेत. तसेच संचालक म्हणून धनंजय कृष्णा वाडकर, अंकुश पांडुरंग खंडाळे, राजाराम बाबुराव तुपे, सुरेश वाघू राजीवडे, भाऊ चंदर मळेकर, निलेश बबन सोनवणे यांचा समावेश आहे.
महिला प्रतिनिधीत्वामध्ये अनिता दत्तात्रय गावडे व सुरेखा रमेश कोंडे कार्यरत आहेत. इतर मागास प्रवर्गातून विठ्ठल धोंडीबा गोरे, भटक्या विमुक्त जाती प्रतिनिधी म्हणून प्रविण विष्णू शिंदे तर ग्रामपंचायत प्रतिनिधींमध्ये महेश अशोक धाडवे, दिपक दिनकर गायकवाड आणि शहाजी दिलीप बोरगे यांचा समावेश आहे.
व्यापारी व आडते मतदारसंघातून नवनाथ विठ्ठल भिलारे व राजेंद्र दिनकर शेटे, तसेच हमाल व तोलारी मतदारसंघातून विनोद गुलाबराव खुटवड हे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान, नव्या निवडीत सुरेश वाघू राजीवडे यांची सभापतीपदी आणि प्रविण विष्णू शिंदे यांची उपसभापतीपदी निवड झाल्याने विद्यमान संचालक मंडळातील नेतृत्वात बदल झाला आहे. या बदलामुळे बाजार समितीच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


