लोणंद येथे राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांनी डॉक्टर आंबेडकर प्रतिमेस अभिवादन
दिलीप वाघमारे
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्ताने लोणंद पंचशील बुद्ध विहार येथे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री जननायक नामदार मकरंद आबा पाटील यांनी उपस्थित राहून बाबासाहेबांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन केले. लोणंद मधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारले जाणार असून त्या साठी निधी व जागा मोफत उपलब्ध करून देन्याचा या निमित्ताने उपस्थित नागरिकांना शब्द दिला. या प्रसंगी लोणंद मधील नगराध्यक्ष मधुमती ताई गालिंदे, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शेळके, पंचायत समिती सदस्य यशवंत खुंटे, नगरसेवक शिवाजीराव शेळके, सचिन शेळके, सागर शेळके, सौ. सीमा वैभव खरात सुप्रिया शेळके, आदी उपस्थित होते. कार्यक्रमास युवा नेते वैभव (बंटी) खरात, जयंती समितीचे अध्यक्ष निखिल खरात, उपाध्यक्ष स्वप्नील वाघमारे, पत्रकार संतोष खरात, कायदेशीर सल्लागार ॲड. हेमंत खरात, संयोजक अमित खरात, ॲड. निखिल खरात, बाळा खरात, सनी भैया खरात, युवराज खरात इतर सदस्य उपस्थित होते.


