देशात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले.


 

प्रतिनिधी : भारतीय निवडणूक आयोग २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या. दोन्ही नवीन निवडणूक आयुक्तांनी पदभार स्वीकारताच निवडणूक आयोगाने चार राज्यांच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. देशातील ७ टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

२०१९ साली स्थापन झालेल्या मोदी सरकारचा कार्यकाळ ६ जून रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे देशात लोकसभेच्या निवडणुका घेण्यात येत आहे. त्यानुसार, १९ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार असून २ जून रोजी सात टप्पे संपणार आहेत.

लोकसभा निवडणुकीची काय आहेत वैशिष्ट्य ?

देशात एकूण 97.8 कोटी मतदार

49 कोटी पुरुष, 47 कोटी महिला मतदार.85 वर्षावरील मतदारांना घरुन मतदान करता येणार

ADVERTISEMENT

1.82 कोटी नवे मतदार

18 ते 21 वयोगटातील 21.50 कोटी मतदार

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

 

 

 

 

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!