राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय, सातारा – महिला मेळावा.
प्रतिनिधी: शंकर माने सातारा16 एप्रिल :आज सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात महिला भगिनींचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित राहून महिला भगिनींशी संवाद साधत त्यांना संबोधित केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व आदरणीय शरद पवार साहेबांनी महिलांना समान संधी देण्याचा, वडिलांच्या मालमत्तेमध्ये वाटा देण्याचा व घरावरती समान हक्क देण्याचा असे अनेक निर्णय घेतले आहेत. महिला आरक्षणाची सुरुवात आदरणीय शरद पवार साहेब यांनीच केली होती.
७३ वी घटना दुरुस्ती करून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण आणलं. महाराष्ट्रात मंडल आयोग लागू केला. संरक्षण मंत्री असताना पवार साहेबांनी आर्मी मध्ये महिलांना ११ टक्के आरक्षण दिलं. महिला धोरण आणणारं महाराष्ट्र देशातील पहिला राज्य ठरलं. इंडिया आघाडीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या नवीन नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण, गरीब कुटुंबातील महिलेला दरवर्षी १ लाख रुपये अशा अनेक गोष्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. जाहीर केलेल्या घोषणा अंमलात आणण्यासाठी महाविकास आघाडी पूर्णपणे प्रयत्नशील असेल, असे आश्वासन यावेळी शशिकांत शिंदे यांनी दिले.


