नसरापूर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.
नसरापूर : नसरापूर येथे राहणाऱ्या राजेंद्र सुरेश हाडके वय 32 वर्ष या तरुणाने सोमवार दि. 1/04/24 रोजी दुपारी 4:30 सुमारास राहत्या घरात तुळईला नायलॉन दोरीने फाशी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दि.1/4/24 रोजी दुपारी 4:30 वाजता चे सुमारास कोमल हाडके या बाजारात जात असताना पती राजेंद्र हे त्यांना बाजारपेठेत भेटले व म्हणाले की मी घरी जातो भाजीपाला घेऊन घरी ये असे सांगून घरी गेले. त्यानंतर हाडके या शेटेआळीत घरी गेले असता तेव्हा राजेंद्र हा राहत्या घरात तुळईच्या पाईपला नायलॉन दोरीने गळफास घेऊन मयतस्थितीत लटकत असल्याचे दिसले त्यानंतर आरडाओरडा च्या आवाजाने शेजारीपाजारी लोक गोळा झाले व त्यानंतर पोलीस स्टेशनला मयताची खबर देण्यात आली.
याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना कोंडाळकर करीत आहे.

