भोर तालुक्यातील माझगाव येथील घरामध्ये अज्ञात चोरट्याने केली चोरी.
भोर प्रतिनिधी दि.3 : भोर तालुक्यातील माझगाव येथील घराची खिडकी तोडून अज्ञाताने चोरी केली आहे. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील माझगाव येथील सुधीर स्वादी वय 55 वर्ष सध्या रा. नांदेड सिटी पुणे यांच्या माझगाव येथील घरी सोमवार दि.1/4/24 रोजी रात्री 9:45 वा चे दरम्यान जमीन गट नं.189 मधील घरामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने घराचा दरवाजा कडी कोयंडा व कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कुलूप तुटत नसल्याने त्यांनी किचन रूमची काचेची खिडकी तोडून त्यावाटे आतमध्ये प्रवेश करून किचनरूम मधील शेताच्या व घराच्या मेंटेनसाठी ठेवलेली रोख रक्कम व स्टीलचा डबा असे मिळून 5200 रुपयाची रक्कम अज्ञात चोरट्याने चोरी केली. म्हणून सुधीर स्वादी यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना मदने करीत आहे.