संगीतकार महेश मस्कर याच गायिका साक्षी कोकाटे आणि अभीर शेलार यांच्या आवाजातील माझी एकवीरा माऊली गाण प्रदर्शित.*
सातारा :धर्मेद्र वर्पे.
संगीतकार महेश मस्कर याच गायिका साक्षी कोकाटे आणि अभीर शेलार यांच्या आवाजातील ‘माझी एकवीरा माऊली’ गाण प्रदर्शित
संगीतकार महेश मस्कर याने अप्रतिम अस लिहिलेल ‘माझी एकवीरा माऊली’ हे गाण प्रदर्शित झाल आहे.महेश मस्कर याच संगीतकार म्हणून हे तिसर गाण आहे.नेहमी प्रमाणे महेश मस्कर याने नवोदित कलाकाराना आपल्या गाण्यामध्ये संधी दिली आहे.नवोदित कलाकारांना असे व्यासपीठ तयार करून देणारा हा पहिला युवा दिग्दर्शक आहे.’माझी एकवीरा माऊली’ या त्याच्या गाण्यामध्ये महेश मस्कर याने वैष्णवी मस्कर,वैशाली भोसले,प्रेरणा मोरे,भूमिका मस्कर अनिकेत बनायित या नवोदित कलाकाराना संधी दिली आहे.
गायिका साक्षी कोकाटे आणि गायक अभीर शेलार यांच्या गोड आवाजामधील हे गाण महेश मस्कर याने संगीतबद्ध केल.साक्षी आणि अभीर या दोघानी कमालीच गाण गायल आहे.गाण्याचे सुंदर अस संगीत संयोजन कृपेश पाटील यानी केल आहे.आणि अलंकार गोपाळे याने छायाचित्रण केल आहे.त्याच बरोबर या गाण्याविषयी बोलताना महेश मस्कर याने असे सांगितले की,मी आई दुर्गा माते ला खुप मनातो.आम्ही आमच्या गावी नवरात्र उत्सव अगदी मोठ्या उत्साहात साजरा करतो.तर माऊली वरती काहीतरी प्रोजेक्ट करावा अस मनामध्ये होत याचमुळे ‘माझी एकविरा माऊली’ हे गाण लिहायला घेतल आणि ते गाण आज प्रदर्शित होत आहे.याचा मला फार आनंद होत आहे.नक्कीच कलाकारानी मेहनत घेतली आहे.प्रेक्षकांना नक्कीच ‘माझी एकवीरा माऊली’ हे गाण आवडेल असेही संगीतकार लेखक दिग्दर्शक महेश मस्कर याने सांगितले.