युवतींनी उभारला छत्रपती शासनाचा चौरंग.. पहिल्याच दिवशी तुफान गर्दीत झाला शुभारंभ
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी बजरंग चौधरी
सातारा : छत्रपती शिवरायांच्या इतिहास म्हणजे कितीही संशोधक अभ्यास केला तरी न सुटणारे कोडे. जागतिक पातळीवर छत्रपती शिवरायांच्या चुकांच संशोधन करणार्या अनेक संशोधकांना छत्रपतींच्या चालणाऱ्या व वागणार्या शिव छत्रपतींच्या काळातील चुका संशोधकांना सापडल्या नाहीत…….
छत्रपतींचे शासन हेच सर्व धर्मियांच शासन अस मत जगातील किर्तीवतांनी संबोधले जात म्हणून छत्रपतींच्या शासनाच्या विचार प्रेरणेतून तयार झालेला छत्रपती शिवरायांच्या पावित्र्य भूमितील ” पुन्हा एकदा चौरंग ” चित्रपटाच्या शुभारंभ म्हणजे सुशिक्षित मुलीवरील अत्याचाराची संघर्षगाथा असा चालू घडामोडीवर आधारित चित्रपट ……
चित्रपटाची कथा जेष्ठ लेखक प्रताप गंगावणे यांच्या पंच्याहत्तर चित्रपटाच्या दृष्टीने चालू घडामोडीवर व चालू जमान्यातील सध्य परिस्थितींमध्ये वावरणार्या सामाजिक राजकीय सद्यस्थितीचा अभ्यासपूर्ण नमुना असून पाश्चिम महाराष्ट्रात आज लाखो तरुणींच्या – भिडणारे कथेच लेखन तरुणींच्या मनात ऊर्जा देत असले तरी गुलामगिरीच्या चक्रव्ह्यूवात अडकलेल्या शासकीय पोलीस कर्मचाऱ्यांची व अधिकारी यांची झालेल्या मुस्कटदाबीने अन्यायाशी व अत्याचार करणार्या ऐशितशी करणार्या या अधिकार्यांसह अत्याचार करणार्या राजकीय पुत्राच्या व मित्र सवंगड्यासह व दबलेल्या अधिकारांचा अत्याचार निगडित मैत्रिणीनी केलेल्या ” पुन्हा एकदा चौरंग ” हे लिखाण म्हणजे चालू घडामोडीवर आधारित आहे…
साताऱ्याचे जेष्ठ उद्योजक राजेंद्र मोहिते यांनी चित्रपटाच्या निर्मितीतून समाजप्रबोधन म्हणून ह्या चित्रपटाची निर्मिती करून नव निर्माते होण्याचा मान मिळविला असून शिक्षणासाठी शहरात आलेल्या एका पेईंगगेस्टच्या घरी राहणार्या पाच मुलींची कथा असणार्या या चित्रपटात गडगंज असलेल्या राजकीय पुत्राने एका सोज्वळ मुलीवर अत्याचार करून तिला जीवंत जाळून राजकिय दडपणातून नामानिराळे होणाऱ्या या राजकिय सुपुत्राला व त्याचा मित्रांचा व अधिकारांचा इतर चार जणींनी मिळून केलेला चौरंग पाहण्यात खुप गंभीर वाटत असले तरी फुलवाल्या कुटुंबातली कथा गंगावणे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारली आहे
या चित्रपटास सागर मोहिते यांनी अप्रतिम दिग्दर्शन केले आहे,श्री विरेन्द्र केजंळे यांनी संगीत दिले आहे,भुषण प्रधान, सौरभ गोखले, अरूण नलावडे, महेश कोकाटे, जयंत वाडकर, लता सरदेसाई, सिध्दी पाटणे,बालकृष्ण शिंदे, संतोष पाटील, सलोनी सातपुते, प्रतीक्षा पगारे, हर्षदा तोंडिलकर,श्रध्दा नालिंदे ,हे कलाकार आहेत.
कार्यक्रमास सौ अपर्णा देसाई संचालीका मुक्तागंण फाऊंडेशन माण,श्रीकांत कात्रे, राजेश निबांळकर, शरद काटकर, मास अध्यक्ष संजोग मोहिते, पत्रकार मोहन जगताप, संतोष पवार, मधुसूदन पत्की, बाबर उपस्थित होते.चित्रपटाचा प्रिमीयरला प्रेक्षकानी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. उभारला छत्रपती शासनाचा चौरंग..
पहिल्याच दिवशी तुफान गर्दीत झाला शुभारंभ