शासन आपल्या दारी संकल्पनेतून शलाका कोंडे यांचे मार्गदर्शन शिबीर तसेच कागदपत्रे नुतनीकरण शिबिराचे आयोजन.
कार्यकारी संपादक : सागर खुडे
भोर तालुक्याच्या काही पूर्व भागामध्ये विविध गावांमध्ये जिल्हा परिषद सदस्यां शलाका कोंडे यांस कडून महिला गावभेटीतून संपर्क दौरा आणि बैठका घेण्यात येत असून या दौऱ्यादरम्यान अनेक महिलांनी आधार कार्ड,रेशनिंग कार्ड नाव वाढवणे,नाव कमी करणे किंवा त्यामधील कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यासंबंधी निर्माण होणाऱ्या त्यातील अडीअडचणी,आधार कार्ड नोंद किंवा नावातील आणि बँक खात्यांच्या केल्या जाणाऱ्या लिंकिंग प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी,आयुष्यमान भारत योजना,संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ अशा नानाविध योजनांचे येणारे अनुदान बंद असल्यासंदर्भात अनेक तक्रारी केल्या केल्या होत्या.

त्यानुसार महिलांच्या या तक्रारीचे निरसन करण्यासाठी व महिलांची मागणी पूर्ण करण्यासाठी लवकरच भोर तालुक्यातील संबंधित गावागावात विशेष प्रयत्नातून मा.युवा सरपंच विकास चव्हाण याच्या तसेच मा.जिल्हा परिषद सदस्य मा.जिल्हा नियोजन समिती सदस्य कुलदीप कोंडे व अमोल पांगारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर (कॅम्प) लावण्यात येणार आहे.त्याच्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे सर्वानी जमा करायला सुरुवात करावी. असे आवाहनदेखील यावेळी करण्यात आले.
प्रामुख्यानं “जुन्या रेशन कार्ड वरचे नाव कमी केलेला दाखला तसेच मुलांचे जन्माचे दाखले” हा अंत्यत जरुरीचा आहे तरी सर्वानी तो दाखला नाव कमी करुन काढून घ्यावा असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यासाठी लागणारी आवश्यक सर्व इतर कागदपत्रे त्यांनी दिलेल्या माहिती मध्ये नमूद आहेत.
तरी या शिबिराचे आयोजनाची तारीख लवकरच कळवू असेही यावेळी त्यांनी सांगितले.



