संदीप गिल यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला, तर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पदोन्नतीने पुणे शहरात बदली,


पुणे :- राज्यांत राज्य गृह विभागाकडून सध्या पोलीस प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आदेश जारी होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून संदीप गिल यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून शनिवारी दुपारी मावळते पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. तर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पदोन्नतीने पुणे शहरांत अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे याबाबत शुक्रवारी राज्य गृह विभागाने आदेश दिले आहेत. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त असलेले संदीप गिल यांची यापूर्वीही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली होती. मात्र पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचा कार्यकाळ पूर्ण न झाल्याने प्रशासकीय सेवा प्राधिकरणात (मॅटमध्ये) धाव घेतली होती त्यांनी कार्यकाळ पूर्ण करण्याची विनंती केली होती. अखेर देशमुख यांनी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यानंतर गेली यांना पोलीस उपयुक्त पदावरून कार्यमुक्त करण्याचे आदेश पुणे शहरांचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. संदीप गिल यांनी परिमंडळचे पोलीस उपायुक्त पदावर असताना गणेशोत्सवातील बंदोबस्त तसेच अनेक महत्त्वांच्या कार्यक्रमाचा बंदोबस्त पार पाडला. विविध सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची सातत्याने संवाद साधल्यामुळे गिल हे पुणे शहरांत लोकप्रिय अधिकारी ठरले होते. सर्व समाज घटकांमध्ये थेट मिळून मिसळून राहणारा अधिकारी म्हणून त्यांचा चांगलाच नावलौकिक आहे. संदीप गिल हे एक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय आयपीएस अधिकारी म्हणूनही त्यांना चांगले ओळखले जाते. तर मावळते पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनीही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यापासून देशमुख देखील नेहमीच प्रयत्नशील राहिले, यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक दालनात संदीप गिल यांचे स्वागत करीत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी त्यांच्याकडे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे सोपविली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!