विनोदी कीर्तनकार ह.भ‌प. मधुकर गिरी गोसावी यांचे निधन वारकरी संप्रदायासह गोसावी समाजावर शोककळा..!


संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी. संपूर्ण महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यांतून आपल्या आगळ्यावेगळ्या विनोदी शैलीतून कीर्तनाची मंत्रमुग्ध करणारे जेष्ठ कीर्तनकार समाज प्रबोधन आणि वारकरी संप्रदायाचे प्राचारक ह. भ‌. प. विनोदीचार्य मधुकर महाराज गिरी गोसावी यांच्या सकाळी निधन झाले त्यांचे वय 95 वर्षे होते. त्यांचा निधनाने वारकरी संप्रदायासह गोसावी समाजावर शोककळा पसरली आहे,ह.भ.प. मधुकर गिरी महाराज मागील काही दिवसांपासून दीर्घ आजारांच्या अल्पशा आजारांमुळे सोलापुरात अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते, आज सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वांस घेतला, मधुकर गिरी गोसावी महाराज हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील नानज येथील रहिवासी होते. त्यांनी आयुष्यभर ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून काम करतानाच कीर्तनाची सेवा चालू ठेवली विनोदी ढगात गंभीर सामाजिक विषय मांडण्याची त्यांची नेहमीच शैली प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरवली होती, ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत त्यांची कीर्तनाची लाखों लोकांपर्यंत धर्म अध्याम व सामाजिक संदेश पोहोचवला गेला, प्रबोधन यांचा सुंदर संगम असायचा त्यांनी अखेरचा श्वासापर्यंत समाज प्रबोधनाची मशाल कायमच अखंड प्रज्वलित ठेवली, त्यांच्या पार्थिंवावर नानज (तालुका.(सोलापूर) येथे आज दुपारी राम कृष्ण हरी आणि नमो नारायण चा गजर..! जड अंतकरणाने दफनविधी करण्यात आला, यावेळी उपस्थितांना आणि गिरी कुटुंबीयांना अश्रूं अनावर झाले, ह. भ. प.मधुकर गिरी गोसावी महाराज यांच्या जाण्यांमुळे वारकरी संप्रदायाचा संपूर्ण गोसावी समाजातून हळहळ व्यक्त केली जात आहे, तर वारकरी संप्रदायातून महाराष्ट्रांच्या भूमीवर असा कीर्तनकार पुन्हा होणे नाही…! अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!