लोणंद येथील साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांचे कार्य कौतुकास्पद जिल्ह्याने आदर्श घ्यावा.


संपादक:दिलीप वाघमारे

सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख असणारे साथ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कय्युमभाई मुल्ला हे गेले अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर, समर्पित आणि मेहनती असणारे सामाजिक कार्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कय्युमभाई मुल्ला आहेत.

 

यांनी केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा –

वृक्षारोपण, वनसंवर्धन, रक्तदान शिबीर, रक्त घटक तपासणी शिबीर, सामुदायिक विवाह सोहळा, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी /अभिवादीत करणे , गरिब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय दत्तक, शालेय साहित्य वाटप, अनेकांचे डोळ्यांचे व इतर आप्रेशन साठी मोठे योगदान , पशुपक्षांसाठी पाणवठे, दर महिला दिनानिमित्ताने वयोवृद्ध महिलांना मोफत पंढरपूर तुळजापूर देवदर्शन, मराठी शाळा सक्षमीकरण , ग्रामीण रुग्णालय उभारणी , विविध रस्ते उभारणी व दुरुस्ती बाबत आंदोलने व पाठपुरावा करुन यशस्वी, लोणंद शहरातील राष्ट्रीय बैंक चे एटीएम सुविधांसाठी सर्व प्रथम मागणी व यश, बसस्थानक ची सुधारना, शहरात सी सी टी व्ही बसविण्यात खुप मोठी जबाबदारी, विद्यार्थ्यांना गुणात्मक व कला गुणांना वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन, विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन, लोणंद व पंचक्रोशीतील शांतता कमिटीत सक्रीय सहभाग, कब्रस्तान मधील विविध समस्यांचे निवारण, लोणंद शहरातील पाण्याची टाकी उभारणी होणे बाबत आंदोलन व पाठपुरावा, नगरपंचायत कर कमी होण्यासाठी पाठपुरावा, कोविड 19 च्या महामारीत भरीव कामगिरी या मध्ये अन्नछत्र, किराणा साहित्य, मास्क, सेनिटायझर आदी मुलभूत सुविधा लोणंद शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्य़ात पुरविल्या, बेवारस व गरिबांचे मोफत अंत्यविधी, गरिबाच्या घरी दिवाळी उपक्रमांतर्गत मिठाई, ब्लॅंकेट, कपडे वाटप, पुरग्रस्त भागात भरीव योगदान,जिथे अन्याय तिथे सामाजिक चळवळीतील कय्युम मुल्ला उभे, अनेकांच्या सुख दुःखात उत्स्फूर्तपणे आवर्जून सहभागी होणारे कय्युम मुल्ला यांनी अशा आजवर अनेक निस्वार्थीपणे केलेल्या समाज व देश हितासाठी च्या कार्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहुन जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे,

ADVERTISEMENT

 

अशा निस्वार्थी कार्यांचा सन्मान म्हणून कय्युम मुल्ला यांस आद्य क्रांतिवीर राजेउमाजी नाईक पुरस्कार, पोलीस पाटील संघटनेचे वतीने समाज भूषण पुरस्कार, सेवा भुषण पुरस्कार तसेच खा.छ.उदयनराजे भोसले यांकडुन खलिता तसेच विविध संस्था संघटनां वतीने सन्मानपत्रे आदी पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.

 

कय्युम भाई तुम्ही अमूल्य रत्नांपैकी एक आहात. सर्वांना आवडणारा आणि कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी संपर्कात येणारा एक दयाळू व्यक्ती आहात या खास दिवशी, तुमचे जीवन चांगुलपणाने आणि सामाजिक कार्याच्या रोमांचक क्षणांनी भरलेले असावे महान व्यक्तिमत्व आणि खऱ्या समाजसेवक असणाऱ्या कय्युम भाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!