पुणे ग्रॅन्ड टूर सायकल रेस निमित्त मोहरी खुर्द येथे तहसीलदारांच्या उपस्थितीत लोकवर्गणीतून वृक्षलागवड.


भोर : राष्ट्रीय पातळीवरील ‘पुणे ग्रँड चॅलेंज २०२६’ ही सायकल स्पर्धा पुणे शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेचा मार्ग मोहरी गावातून जात असल्याने, त्या अनुषंगाने मोहरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली.

रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड झाल्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे. ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून “दुतर्फा वृक्षलागवड” हा विषय घेऊन मोहरी खुर्द येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रस्त्याच्या दुतर्फा एकूण ११११ वृक्षांची लागवड करण्यात आली.

ADVERTISEMENT

या कार्यक्रमप्रसंगी भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन, मंडल अधिकारी मनोज ढवळे, तलाठी हिमाणी चोपडे, ग्रामसेवक खुडे, शिक्षक नितीन कांबळे, पोलीस पाटील गोरक्षनाथ सुतार, गावचे माजी सरपंच सागर पांगारकर, उपसरपंच मनिषा पांगारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

वृक्षांचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी संबंधित ठिकाणी वृक्ष संवर्धनाबाबत माहिती फलक लावण्यात येणार असल्याची माहिती प्रथमेश पांगारकर यांनी दिली.

या कार्यक्रमाचे संयोजन मराठा ग्रुपचे अध्यक्ष आकाश पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यामध्ये सदस्य प्रवीण पांगारकर, सचिन पांगारकर, विशाल पांगारकर, तेजस पांगारकर, ऋतिक पांगारकर, प्रतीक पांगारकर, वैभव पांगारकर, संग्राम पांगारकर, भरत पांगारकर, प्रणव पांगारकर, परशूराम जांभळे, अविनाश जांभळे, पांडुरंग देवघरे तसेच सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!