राजापूर गावात शासकीय योजना पोहचवण्यासाठी महिला संवाद बैठक! शलाका कोंडे मा. जि. प. सदस्या
सारोळे : भोर, राजगड (वेल्हा) मुळशीचे युवा नेते कुलदिप कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा आदर्श जिल्हा परिषद सदस्य शलाका कोंडे यांनी राजापुर गावीतील महिलांना मार्गदर्शन केले.आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना,बांधकाम कामगार योजना, रेशनकार्ड, मतदान कार्ड, इत्यादी योजनेची माहिती शलाका कोंडे यांनी दिली.महिलांचे प्रश्न समजावून घेऊन.त्यांना मार्गदर्शन केले.एव्हढेच नाही तर प्रत्यक्षात कॅम्पचे आयोजन करणे,ज्यांना लाडकी बहीण योजनेचा फाॅर्म भरताना अडचन येत आहे.तिथे फाॅर्म भरून दिले जातील.कागदपत्रे काढताना अडचन आली तर तलाठी ग्रामसेवक त्या ठिकाणी उपस्थित राहुन तात्काळ कागदपत्रे दिली जातील पण या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेतली.तसेच बचत गटांना प्रोत्साहनपर अनुदान उपलब्ध करून देणे.तसेच बचत गट जास्तीत जास्त संख्येने होऊन.महिलांचे संघटन वाढवणे.शासकीय योजना पोहवणे.इत्यादी माहिती दिली.यावेळी राजापुर गावातील सरपंच बाळासाहेब बोबडे तंटामुक्त अध्यक्ष सुरेश बागल,दिलीप बोबडे,संतोष बोबडे, दिलीप बागल पुर्व भागाचे युवा नेते हर्षद बोबडे सर, युवा मा. सरपंच विकास चव्हाण, संदिप सोनवणे,प्रहार जनशक्ती पक्ष भोर उपाध्यक्ष अजय कांबळे,तसेच राजापुर गावातील युवक संदिप बोबडे, महेश बोबडे, शांताराम खुटवड,सचिन खुटवड, प्रमोद बोबडे, नवनाथ बागल, सचिन बोबडे, प्रथमेश खुटवड, बचतगटातील अध्यक्षा आशा, महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

