महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम यांची स्मार्ट पॉलिसिन्ग अवॉर्डसाठी निवड.
नसरापूर :- दिल्ली येथे एफ आय सी सी आय मार्फत स्मार्ट पॉलिसिन्ग अवॉर्ड 2025 हा वुमन्स चाइल्ड सेफ्टी अँड रिलेटेड क्राईम अवॉर्ड करता संपूर्ण भारत देशामध्ये पोलीस खात्यातील एकूण 23 विभागापैकी एकूण 20 आयपीएस दर्जाचे अधिकारी व राजगड पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम यांची निवड झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र मधून माननीय निलोट पाल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व माननीय नुरल हुसेन पोलीस अधीक्षक भंडारा आणि महिला पोलीस हवालदार अशी तिघांची निवड करण्यात आलेली आहे.
प्रमिला निकम यांनी FICCI मार्फत दिला गेलेला स्मार्ट पोलिसिन्ग अवॉर्ड 2025 CCI FICCI याचे श्रेय हे मा. पंकज देशमुख,पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण,मा.बिराजदार अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, मा.तानाजी बर्डे उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांचे मोलाचे सहकार्य तसेच बंधू मा. राजेश गवळी पोलीस निरीक्षक यांनी नेहमीच चांगल्या वाईट प्रसंगामध्ये साथ देऊन चांगल्या कामासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. व इतर अधिकारी, सहकारी यांचे देखील मनापासून धन्यवाद मानले.
समाजातील सर्वच स्तरातील नागरिक, माझ्या भगिनी तसेच प्रिंट मीडिया, पत्रकार मीडिया, सोशल मीडिया यांनी देखील नेहमीच सहकार्य केले, प्रोत्साहन दिले. त्याबद्दल त्यांचे देखील खुप आभार प्रमिला निकम यांनी मानले.
महाराष्ट्र पोलिसांची देशपातळीवर मान उंचावली आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामीण भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना खेळांच्या माध्यमांतून स्त्री-पुरूष समानता तसेच कायद्याने व संविधानाने प्रदान केलेले अधिकार व कर्तव्य त्यांच्या मनात रूजवण्यासाठी उपक्रम हाती घेतला होता.
प्रमिला निकम यांनी मुलांकडून हे खेळ करून घेतले. या खेळांच्या माध्यमांतून त्यांना छेडछाडी, टिंगलटवाळी, रोडरोमिओगिरी, सायबर गुन्हे, अॅसिड अटॅक, बलात्कार, घरगुती हिंसा, कौटांबिक हिंसा, या विषयाप्रती संवदेनशिलता निर्माण केली. तसेच प्रत्येकाला त्यांचे न्याय हक्क व कर्तव्य यांची परिपूर्ण माहिती देवून मार्गदर्शन केले. या अभिन्न उपक्रमाला तरूणांमधून भरघोस प्रतिसाद व सहकार्य लाभले


