सारोळे गावात २० वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना.
दि. ८ सारोळे : देशभरामध्ये सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. लोकांनी आपल्या घरांमध्ये गणरायाची स्थापना केली आहे. महाराष्ट्र मध्ये गणेशोत्सवाच्या “एक गाव एक गणपती “अशा परंपरा आढळतात. अशीच एक परंपरा भोर तालुक्यातील सारोळे येथील युवकांनी वीस वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना जोपासली आहे. गणेशोत्सवात रमेश धाडवे,विठ्ठल धाडवे,संतोष धाडवे,स्वप्निल धाडवे, बंटी धाडवे,विशाल धाडवे,तुषार धाडवे, विकी मोरे,सोहन धाडवे,मनीष धाडवे,ऋषी धाडवे,योगेश राजपुरे,अमोल भरगुडे,निलेश धाडवे,दत्ता कोठुळे, इतिहासकार,शिवभक्त दत्ताभाऊ मळेकर, मिथुन दळवी, सागर तनपुरे, शुभम दळवी, गणेश भरगुडे, योगेश साळुंके, मनिष बा. धाडवे आदी युवक विधायक उपक्रम राबवत आहेत.
यावर्षी सामाजिक व शैक्षणिक उपक्रमातून उत्सव साजरा करत आहेत.” होम मिनिस्टर “हा कार्यक्रम सर्वात मोठा करणार आहे. श्री विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने झांजपथकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. श्री पूजेला येणाऱ्या व्यक्तीने दानपेटीत पैसे न टाकता त्यात शैक्षणिक साहित्य टाकण्यास सांगितले. ते साहित्य संकलित करुन अनाथ, निराधार, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. गणेश मंडळांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सारोळे गावाने ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवून इतरांनाही संदेश दिला आहे. एक गाव एक गणपतीची संकल्पना प्रत्यक्षात रुजवून समाजोपयोगी उपक्रम राबवले जात असून, गावकऱ्यांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
विविध गावातील गणेश मंडळांनी पोलिसांशी संपर्क साधून परवानगी घेतली आहे. “एक गाव एक गणपती”ही संकल्पना राबवून इतरांनाही संदेश दिला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली किकवी चौकीतील ASI शिरसाठ,मदने नाना, मयूर निंबाळकर, गणेश लडकत, राजेंद्र चव्हाण, गव्हाणे,नरुटे,गणेश उत्सव काळात हद्दीतील विविध गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.
पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, राजगड पोलीस स्टेशन


