श्री छत्रपती शिवाजी विद्यालय किकवीच्या विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड……
संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
दि. ८ सारोळे : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे अंतर्गत काल दि.६सप्टेंबर२४ रोजी नवसह्याद्री गुरुकुल आणि ज्युनिअर कॉलेज नायगाव येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ आणि तायक्वांदो शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये क्रीडा प्रेमींनी आणि तालुक्यांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,माध्यमिक,उच्चमाध्यमिक विद्यालये तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उस्फुर्त सहभागी झाले.या झालेल्या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत १७वर्षाखालील वयोगटामध्ये श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी.आरुषी भोईर आणि कुमारी गिरिजा पांगारे या दोघींनी आपल्या क्रीडा प्रेमाच्या आणि कौशल्याच्या बळावर घवघवीत यश संपादन केलेलं पाहावयास मिळाले.आणि या निवड चाचणीतून त्यांची जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे,यामुळे नक्कीच त्यांच्या पालकांचे,शाळेचे,आणि गावाच्या नावामध्ये परिसासमान मानाचा तुरा शिरपेचात खोवला गेला आहे. त्याबद्दल त्यांचे प्रशिक्षक यांचं तोंडभरून कौतुक करीत तिच्या पालकानी, तसेच क्रीडा मार्गदर्शक भगत, विद्यालयातील तिचे मार्गदर्शक शिक्षकवृंद,मुख्याध्यापक प्रा.विनोद राऊत,प्रा.बोबडे ,लिपिक सागर भिलारे सारोळे माध्यमिक विद्यालयातील शिक्षक विशाल धाडवे यांनी देखील त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल स्वागत करीत आभार व्यक्त केले.
यावेळी सर्व मार्गदर्शक शिक्षकवृंद आणि तिचे पालक उपस्थित होते.


