कुसूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. सुजाता तानाजी नरुटे यांची बिनविरोध निवड सर्व स्तरांतून अभिनंदन चा वर्षाव
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
फलटण तालुक्यांतील कुसूर गावच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर सौ. सुजाता तानाजी नरुटे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर गावातील विकास कामांना प्रथम प्रधान्य देणार असे नूतन उपसरपंच सौ. सुजाता तानाजी नरुटे यांनी सांगितले आहे. बिनविरोध निवड होताच कुसूर गावात गुलालाची उधळण करीत आनंद साजरा करण्यात आला. त्यांच्या निवडीबद्दल सौ. सुजाता नरुटे कुसूर गावातील उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने यांचा सत्कार आणि परिसरांतून अभिनंदन चा वर्षाव होत आहे. मावळते उपसरपंच अनिल धुमाळ यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या पदाच्या निवडीसाठी अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या उपसरपंच पदासाठी सौ. सुजाता नरुटे यांचा एकमेव अर्ज दाखल होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी निवडणूक अधिकारी एस.के कुंभार यांनी काम पहिले होते. ग्रामसेवक मुगुटराव सोनवलकर यांनी सहकार्य केले. यावेळी पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्या उपस्थित नूतन उपसरपंच सौ. सुजाता नरुटे यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरांतून अभिनंदन चा वर्षाव होत आहे. सौ. सुजाता नरुटे यांना समस्त पुरीगोसावी परिवार आणि रोखठोक महाराष्ट्र ग्रुपकडूंन शुभेच्छा आहेत.


