जि.प.शाळा न्हावी शाळेतील विध्यार्थ्यांनी आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत क्षेत्रभेटीत ऊसतोड कामगारांच्या शाळाबाह्य मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांना घातली साद.
न्हावी:- दरवर्षी स्थलांतरित ऊस तोडकामगार दूरवरून,विदर्भ मराठवाड्यातून साखर कारखान्यावर ऊस तोडायला येतात.अनेक अडचणीवर मात करत उदरनिर्वाह करतात. शाळेतील विध्यार्थ्यांना या संपूर्ण वास्तवाची जाणीव व्हावी,स्थलांतरित मजुरांचे प्रश्न,मुलांच्या शिक्षणातील अडचणी, राहण्याच्या कोपिंची रचना,दिवसभरातील कष्ट,आरोग्याचे प्रश्न,स्वच्छतेचा अभाव,व्यसनाधिनता,
भौतिक सुविधांचा अभाव,आर्थिक शोषण अशा अनेक प्रश्नावर जाणीव जागृती व्हावी संवेदनशील पिढी तयार व्हावी.समाजाप्रती कृतज्ञता प्रकट व्हावी, समाजभान जपले जावे.या उद्देशाने शाळेने क्षेत्रभेट,शिवारफेरी आयोजित केली होती.
निमित्त होते वेदांत अय्यप्पन सेवा फौंडेशन ठाणे यांचेकडून प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या ऊसतोड कामगारांना तांदूळ,तेल, मैदा,आटा,साखर,रवा, तूरडाळ जि.प.शाळा न्हावी शाळेतील विध्यार्थ्यांच्या हस्ते किराणा किट वाटप करण्याचे.यावेळी विध्यार्थ्यानी स्थलांतरित पालकांच्या समोर शाळाबाह्य मुलांना शाळेत पाठवण्यासाठी आर्त विनवणी केली. विध्यार्थ्यानी सकारात्मक प्रश्न विचारून पालकांना बोलते केले, मुलांना तुम्ही शाळेत पाठवा आम्ही त्यांना सांभाळून घेऊ,त्यांना शिक्षणातील अडचणीत मदत करू, शाळेतील शिक्षक विध्यार्थीप्रिय आहेत तुम्ही फक्त मुलांना शाळेत पाठवा अशी सर्व मुलांनी साद घातली.
यावेळी वेदांत अय्यप्पन सेवा फौंडेशन ठाणेचे पदाधिकारी रमेश चल्लम साहेब व गणेश काळे साहेब
यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे संयोजन श्री.अनिल चाचर, रुपाली पिसाळ, पूनम सोनवणे, सोनाली बोन्द्रे यांनी केले
यावेळी रामचंद्रआबा सोनवणे,गणेश सोनवणे,सचिन सोनवणे,शरद सोनवणे,रजनीकांत सोनवणे,शिवाजी सोनवणे,राहुल सोनवणे,अविनाश भोसले मच्छिन्द्र गव्हाणे ऊसतोड कामगार पालक,विद्यार्थी आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल चाचर यांनी केले तर आभार रुपाली पिसाळ यांनी मानले.
आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा संपादक :मंगेश पवार मोबाईल नं . 9834245095