स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे श्री वेण्णा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज मेढा येथे १०वी, १२वी परीक्षा देण्याची सुवर्ण संधी – प्राचार्य पाटील बी.बी.
पुण्यभूमी प्रतिनिधी : बजरंग चौधरी
मेढा : दि. १२ विद्यार्थी पालक आपल्या मागणी नुसार १०वी, १२वी परीक्षा देण्याची संधी श्री वेण्णा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज मेढा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यांचे शिक्षण कौटुंबिक अडचणीमुळे खंडित झाले आहे त्यांना आता १०वी, १२वी परीक्षा देता येणार. जे १०वी, १२वी परीक्षेला यापूर्वी या विद्यालयातून बसले होते आणि कांहीं विषय राहिले असतील तर ते विषय घेऊन परत परीक्षेला बसता येईल. ज्यांचे शिक्षण कौटुंबिक अडचणीमुळे, लवकर लग्न झाल्यामुळे अर्धवट राहिले आहे त्यांना १७ नंबर फॉर्म ऑनलाईन भरून शाळेत आणून द्यायचा आहे . अशाप्रकारे ज्यांना १०वी, १२वी परीक्षा द्यायची आहे त्यांना विद्यालयात संधी उपलब्ध करून दिली आहे असे विद्यालयाचे प्राचार्य श्री. पाटील बी. बी. यांनी सांगितले. यासंदर्भात माजी विद्यार्थी, महिला यांनी विधालयाशी संपर्क साधावा.
9423205561