बोंडारवाडी धरणामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे योग्य पुनर्वसन होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही – डॉ.भारत पाटणकर


 

सातारा पुण्यभूमी प्रतिनिधी : बजरंग चौधरी

 

केळघर, ता. १३ : बोंडारवाडी धरणामुळे ज्या गावांचे विस्थापन

होणार आहे, त्या गावांतील बाधितांचे योग्य प्रकारे पुनर्वसन होत नाही, शेवटच्या बाधित शेतकऱ्यास योग्य ती मदत मिळत नाही तो पर्यत स्वस्त बसणार नाही, तोपर्यंत धरण कृती समिती या धरणाची घळभरणी होऊन देणार नाही. ५४ गावांतील शेतकरी बाधितांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, अशी ग्वाही श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर यांनी आज दिली.

 

मेढा येथील कलश मंगल कार्यालयात आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, विलास जवळ, एस एस पार्टे गुरुजी , आनंदराव सपकाळ यांच्यासह ५४ गावांतील शेतकरी उपस्थित होते.

 

डॉ. पाटणकर म्हणाले, “आधी पुनर्वसन मग धरण ही आग्रही भूमिका बोंडारवाडी धरण कृती समितीने सुरुवातीपासून घेतली आहे.

या धरणासाठी (कै.) विजयराव मोकाशी यांनी जनआंदोलन उभे करून ५४ गावांतील नागरिकांना एकसंघ केले होते. धरण होणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर बाधित शेतकऱ्यांना देखील शासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी कृती समिती प्रयत्न करणार

ADVERTISEMENT

आहे.” माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी ५४ गावांच्या

 

मेढा शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ. भारत पाटणकर. समवेत सदाशिव सपकाळ, विलास जवळ, आदिनाथ ओंबळे पार्टे एस. एस.गुरुजी आदी.

 

विकासासाठी हे धरण होणे गरजेचे असून, या धरणामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्धी बरोबर शेतकऱ्यांना देखील लाभ होणार असल्याचे नमूद केले. आदिनाथ ओंबळे यांनी प्रास्ताविक केले. विनोद शिंगटे यांनी सूत्रसंचालन केले, वैभव ऑवळे, विनोद शिंगटे,

 

विजय सावले, स्वप्नील धनावडे यांची भाषणे झाली. मेळावा यशस्वी होण्यासाठी कृती समितीचे श्रीरंग बैलकर, जगन्नाथ जाधव, विलास शिर्के, सुरेश कासुर्डे, बजरंग चौधरी , बाजीराव धनावडे , जनार्दन मोरे , गेणू बुवा दुंदळे , विठ्ठल पवार , संपतराव कदम , चिकणे ( बापू ) कुसूंबी सरपंच यांच्यासह कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!