सात आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, रत्नागिरी नाशिक जळगांव पुणे प्रशासनात बदल’ नव्या अधिकाऱ्यांनी तात्काळ रुजू व्हा:-मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस..!
संभाजी पुरीगोसावी ( मुंबई ) प्रतिनिधी. गेल्या काही महिन्यांपासून राज्यांमध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा चांगलाच सुरू असुन. आजही पुन्हा राज्य शासनाने वरिष्ठ आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत यामध्ये नाशिक रत्नागिरी पुणे जळगांव या जिल्ह्याचे महत्त्वांच्या प्रशासनिक पदावर नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई चे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह यांची नाशिकच्या कुंभमेळ्याच्या आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नाशिकच्या महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर ठाणे जिल्हा परिषदेचे रोहन घुगे यांची जळगांव जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर जळगांवचे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांची नाशिक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मुंबई व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते यांची रिक्त पदावर पुण्याचे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबईचे सह व्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदाल रत्नागिरी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या नियुक्ती ठिकाणी हजर होण्याचे आदेश देखील माननीय मुख्यमंत्री यांनी दिले आहेत.

