गोकुळ शिरगांव पोलिस ठाणेचा तबसून मगदूम यांनी स्वीकारला पदभार, प्रथमच महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती,
संभाजी पुरीगोसावी (कोल्हापूर जिल्हा) प्रतिनिधी. कोल्हापूर जिल्ह्यातील मागील काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये चालू असणाऱ्या धंद्यांमुळे काही प्रभारी अधिकार्यांच्या तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदल्या करण्यात आल्या होत्या. अचानक बदल्यामुळे कोल्हापूर पोलीस दलातही एकच खळबळ उडाली होती, यामध्ये पोलीस निरीक्षक / सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश, गोकुळ शिरगांव पोलिस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिंगबर गायकवाड यांची लक्ष्मीपुरी पोलीस ठाणेत बदली करण्यात आली होती, मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांचा गोकुळ शिरगांव पोलिस ठाणेत कार्यकाळ हा उत्कृंष्ट ठरला, त्यांच्या रिक्त जागेवर सहाय्यक पोलीस निरीक्षक तबसून मगदूम यांची गोकुळ शिरगांव पोलिस ठाणेच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असुन, या पोलीस ठाणेला प्रथमच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे, गोकुळ शिरगांव पोलीस ठाणेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी तबसून मगदूम यांची प्रभारी अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल समस्त पुरीगोसावी परिवारांतर्फे आणि रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडुंन मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील सेवेसाठी शुभेच्छा आहेत.