100 रुपयांसाठी नारायणगांवात खुन, नारायणगांव पोलिसांनी खुनाचा छडा अवघ्या 24 तासांत लावला,
संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. नारायणगांव पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये दारू पिण्यासाठी उसने दिलेले 100 रुपये परत केले नाहीत म्हणून एकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यांतील नारायणगांव मध्ये ही घटना घडली आहे, बाळू महादेव पोखरकर (वय 41) रा. खोडद ता. जुन्नर ) असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, या प्रकरणी नारायणगांव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे, याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरून बाळू पोखरकर याने राहुल भाऊसाहेब गुळवे याला दारू पिण्यासाठी एक आठवड्याभरांपूर्वी 100 रुपये दिले होते राहुल गुळवे हा पैसे वारंवार मागत होता, मात्र हे पैसे परत न दिल्याने बाळू पोखरकर यांना आरोपी राहुल भाऊसाहेब गुळवे (वय 32 ) रा. शिपलापूर पानवडी ता. संगमनेर जि. अहिल्यानगर सध्या रा. बाजारतळ नारायणगांव ) याने नारायणगांव बस स्थानकांत मोठमोठ्याने शिवीगाळ केली होती, शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून आरोपी राहुल भाऊसाहेब गुळवे यांनी बाळू पोखरकर यांच्यावर शनिवारी रात्री नारायणगांव बस स्थानकांच्या जवळ हल्ला केला, बस स्थानकांच्या मोकळ्या जागेत नेऊन बाजूला दांडक्याने मारहाण केली आणि डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली, याप्रकरणी नारायणगांव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे, आरोपीला अटक केली आहे, या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार करीत आहेत.

