वांग मराठवाडी धरण पर्यटनाचा केंद्र बिंदू ठरतोय.


 

पाटण प्रतिनिधी :शंकर माने

दि.29 मार्च कराड पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांन साठी वरदान ठरलेले वांग मराठवाडी धरण ह्या वर्षी पुर्ण क्षमतेने भरले आहे. धरण पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत चालली असून वांग मराठवाडी धरण पर्यटनाचा केंद्र बिंदू ठरत असुन धरणं परीसरातिल छोटे मोठे व्यवसायांन तेजी प्राप्त झाली आहे. त्यामुळे प्रर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

ADVERTISEMENT

एका बाजूला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे घनदाट जंगल दुसऱ्या बाजूला पवन ऊर्जा कंपनी ची गरगर फिरणारी पाती आणि निसर्गाच्या कोंदणात साकारलेलं वांग मराठवाडी धरण ह्या धरणाच्या कामाला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत 1997 साली सुरवात झाली. पुढे अनेक वर्षे वेगवेगळ्या कारणांनी धरणाचे काम रखडत गेले. कधी धरणग्रस्तांची आंदोलने तर कधी निधीचा तुटवडा ह्या मुळे धरणाच्या कामाला कधी गती मिळालीच नाही. 2012 पासून धरणांच्या जलाशयात थोडा फार पाणी साठा करण्यासाठी सुरुवात केली मात्र धरणाचे काम अपूर्णच होते. पुढे वांग मराठवाडी धरण प्रकल्प प्रधान मंत्री सिंचन योजनेत समाविष्ट करण्यात आला . त्या मुळे धरणाच्या कामाला पुन्हा गती प्राप्त झाली ह्या वर्षी धरणाचे काम पूर्ण झाले असून धरण व्यवस्थापनाने पुर्ण क्षमतेने पाणी साठा केला आहे . त्यामुळे धरण पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत चालली असून विभागात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे श्री क्षेत्र नाईकबा, श्री क्षेत्र वाल्मिकचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक व पर्यटक भोसगाव येथिल फुल पाखरु उद्यान पाहिल्यावर वांग मराठवाडी धरण पाहण्यासाठी येत आहेत. त्यामुळे वांग मराठवाडी धरण पर्यटकांचा केंद्र बिंदू ठरत आहे.

धरण परीसरातिल हाॅटेल व्यवसाय सह इत्तर व्यवसायाला तेजी प्राप्त झाली आहे त्यामुळे इथे जमिनीचे भाव हि गगणाला भिडु लागलें आहेत. वांग मराठवाडी जलाशयात बोटींग व मच्छिमारी व्यवसाय सुरू झाल्यास पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. शासनाने त्या अनुषंगाने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!