भोरमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन.
भोर प्रतिनिधी : सागर खुडे
शिवजयंती उत्सव २०२४ औचित्य साधून कै.कू. गौरव रविंद्र कुंभार व कै.कु.महेश मंगेश नाईक यांच्या स्मरणार्थ सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू फोर्स, शिवतांडव वाद्य पथक ,भोर यांनी केलेल्या आयोजित रक्तदान शिबीर घेण्यात आले होते.
सध्या रुग्णालयात मोठया प्रमाणात रक्ताची चनचन् भासत आहे त्यामुळे सामाजिक बांधिलकी राखत व तरुणांना रक्तदानाविषयी माहिती मिळावी हा उद्देश डोळ्या समोर ठेवून भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात ७५ पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच ३५ पेक्षा अधिक लोकांनी रक्तदाब हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
यावेळी भोर शहरातील समस्त मित्र परिवार यांनी सर्व शिबीर व्यवस्तीत पार पडले तसेच रक्तदात्याला बॅग ,भेट वस्तू म्हणून देण्यात आली.तरी सर्व रक्तदाते व मित्र परिवार यांचे कुंभार परिवार व नाईक परिवाराकडून आभार मांडण्यात आले.
यावेळी अनेक मान्यवर मंडळी व सामाजिक कार्यकर्ते यांनी रक्तदान शिबीरास् भेट दिली.


