मन झालया सैराट’ हे भन्नाट गाण माही इव्हेंट मेनेजमेंट या युटुब चॅनल वरती प्रदर्शित.
मुख्य संपादक : मंगेश पवार
कार्यकारी संपादक : सागर खुडे
‘गुलाबी नऊवारी साडी’ या गाण्याच्या यशानंतर माही इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या माध्यमातुन ‘मन झालया सैराट’ हे ऑफिशियल गाण प्रदर्शित झाल असुन,या गाण्यामध्ये अनोखी प्रेम कथा मुलींची रक्षा करण आपल कर्तव्य आहे.असे भरपूर काही आपल्याला पहायला भेटणार आहे.’सैराट’ या शब्दामध्ये च खुप काही दडल आहे त्यामुळे लोकांना हे गाण नक्की च आवडेल या भावनेने या गाण्याचे लेखक महेश मस्कर यानी सुंदर अशा शब्दामध्ये गाण्याचे लिखान केले आहे.त्याच पद्धतीने अप्रतिम अस विवेक नायर आणि शीतल गंगावणे यानी हे गाण गायल आहे.लव-कुश या जोडीने देखील अतिशय काटेकोर पणे संगीतबद्ध केले आहे.गाण्याला साजेश अस संगीत देखील लव-कुश या जोडीने दिल आहे.निर्माता आणि प्रमूख भूमिकेत असलेला अमर शिंदे याने आपल्या अभिनयाने या गाण्याला चार चाॅंद लावले.त्याच बरोबर प्रणाली भोर हीची त्याला प्रमुख भुमिकेसाठी साथ लाभली.आणि शुभम माने याने उत्कृष्ट दिग्दर्शन केले आहे आणि सह दिग्दर्शन अनिकेत बाणाईत याने केल आहे.सह दिग्दर्शना सोबतच अनिकेत बाणाईत याने अभिनय देखील केला आहे त्याच्यासोबत जयगणेश शेटे सदिच्छा पाटकर, अनिषा निकाळजे,आकाश पासवान,श्रुति माने यानी देखील यामध्ये अभिनय केला आहे. छायाचित्रिकरण कपिल नाईक यानी आपल्या अनोख्या शैली मध्ये केले असुन,हे गाण सुपरहिट च होनार अशी आशा संपूर्ण टीम ने व्यक्त केली आहे.