नांदेडचे खासदार वसंत बळवंतराव चव्हाण यांचे निधन ; हैदराबादमध्ये हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वांस, राजकीय वर्तुळासह नांदेड जिल्ह्यावर शोककळा.


 

संपादक : संभाजी पुरीगोसावी

नांदेड काँग्रेसचे खासदार वसंत बळवंतराव चव्हाण यांचे निधन झाले आहे, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते हैदराबादमध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, काल मध्यरात्री त्यांची अचानक तब्येत बिघडली त्यानंतर पहाटे ३ वाजता त्यांची प्राणज्योत मावळली वसंत चव्हाण यांच्या निधनाने राजकीय वर्तुळासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे, नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून प्रतिनिधित्व केल्यानंतर वसंत बळवंतराव चव्हाण यांनी काँग्रेसकडूंन लोकसभा निवडणूक लढवली होती, नुकत्याच झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडूंन त्यांनी निवडणूक ही दणदणीत लढवली होती, तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्यांचा पराभव केला होता, तसेच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेससाठी नांदेड मधील हा विजय महत्त्वपूर्ण ठरला होता, खासदार होण्यापूर्वी वसंत चव्हाण महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले होते, त्यांनी नायगांव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते, तसेच वसंत चव्हाण यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, याशिवाय मे. 2014 मध्ये यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात आली होती, ते जनता हायस्कूल आणि अग्रीचे अध्यक्षही होते, (खासदार वसंत चव्हाण यांचा राजकीय प्रवास) जन्म 15 ऑगस्ट 1954 – 1987 साली वर्ष नायगांव ग्रामपंचायतचे 24 वर्ष सरपंच 1990 जिल्हा परिषद सदस्य 2002 विधान परिषद सदस्य ( राष्ट्रवादी ) 2009 विधानसभा सदस्य -अपक्ष 2014 विधानसभय सदस्य काँग्रेस 2024 लोकसभा सदस्य काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास होता, राजकीय प्रवासामध्ये त्यांचे खंबीर नेतृत्व आणि सर्वसामान्य गोरगरिबांसाठी अहोरात्र सेवेत असणारे खासदार वसंत चव्हाण यांची कारकीर्द ही राजकीय वर्तुळासह तसेच नांदेडकरांना पहायला मिळाली, खासदार वसंत बळवंतराव चव्हाण यांच्या कुटुंबालाही राजकीय वारसा चांगलाच लाभला होता, त्यांनी आपला राजकीय प्रवासाला सरपंच पदापासून सुरुवात केली होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!